Ad will apear here
Next
७५ जादुगारांच्या कलाविष्काराने पुणेकर मंत्रमुग्ध
ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त या ७५ जादुगारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे :  देशभरातील आणि परदेशातील चार अशा एकूण ७५ जादुगारांच्या जादूचा आविष्कार पुणेकरांनी अनुभवला. ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त या ७५ जादुगारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्स या संस्थेने पीवायसी जिमखान्याच्या सहकार्याने चंद्रशेखर चौधरी यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. पीवायसी जिमखाना येथे सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम झाला. सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्सचे अध्यक्ष भूपेश दवे, पीवायसी क्लबचे अध्यक्ष डॉ. एस. जी. भाटे, सचिव आनंद परांजपे, विजय भावे यांच्यासह अभिनेत्री मृणाल कुलकर्णी  आणि अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही जादूच्या प्रयोगात सहभागी होऊन आनंद लुटला.

ऑस्ट्रेलिया येथील लिऑन्स, केरळचे कुमार कलातील, गोव्याचे प्रेमानंद, दिल्ली येथील रजत, दीपक पांडे, सतीश चोप्रा, हैदराबादचे अली आणि पुण्यातील जितेंद्र रघुवीर, सुरेश राजपूत या जादुगारांनी आपल्या जादूच्या प्रयोगांमधून अनेक करामती दाखवल्या. 

या वेळी डॉ. एस. जी. भाटे म्हणाले, ‘चंद्रशेखर चौधरी यांनी वयाला मागे टाकले, ही जादूच आहे. जादूगार आपल्याला फसवत, हसवत मनोरंजन करतात. आपल्यातील लपलेल्या छोट्या मुलाला जागे करतात, ही मोठी गोष्ट आहे.’

चंद्रशेखर चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZTMCF
Similar Posts
२१ ऑक्टोबरला पुण्यात ७५ जादूगारांच्या जादूचा आविष्कार पुणे : पुण्यातील ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त २१ ऑक्टोबर रोजी ७५ जादूगारांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाणार आहे. हे सर्व जादूगार या वेळी आपल्या जादूचा आविष्कार दाखवणार आहेत. यामध्ये परदेशातील चार जादूगारांचा समावेश आहे.
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
वॉक फॉर खादी : ‘ला-क्लासे’ फॅशन शोने जिंकली मने पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘ला क्लासे’ फॅशन शो नुकताच पार पडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्राचा आणि खादीचा सन्मान वाढविण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर खादी : द नेशन्स प्राइड’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बी. पी. सिंग, विक्रम गोखले यांचा विशेष सन्मान पुणे : अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शक असलेले बी. पी. सिंग आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा ‘एस

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language